Sports

फिबा बास्केटबॉल आशिया चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यांतील एच गटांत सौदी अरेबियाचा विजयी

सौदी अरेबियातील जेदाह इथं सुरु असलेल्या फिबा बास्केटबॉल आशिया चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरी सामन्यांतील एच गटांत सौदी अरेबियानं पॅलेस्टाईनला ९६ – ७२ असं पराभूत करत सामन्यावर विजय मिळवला. यामुळे २०२२ मध्ये जकार्ता इथं होणाऱ्या सामन्यासाठी भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताला सौदी अरेबियाकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र काल झालेल्या सामन्यात पॅलेस्टाईनचा भारतानं ७९-७७ असा पराभव केला. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी सौदीला एकतर पॅलेस्टाईनला हरवणं आवश्यक होतं. भारत आणि सौदी अरेबिया या दोनही संघांकडून पराभूत झाल्यानं पॅलेस्टाईनचं आव्हान संपुष्टात आलं. भारत आणि सौदी अरेबिया आता अंतिम फेरीसाठीच्या १३ संघांमध्ये पात्र ठरला आहे.

Comment here