National

बाबरी मशीद प्रकरण: २९ वर्ष पुर्ण; मथुरेत कडक बंदोबस्त

आज बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 29 वर्ष उलटून गेली आहेत. ६ डिसेंबरला झालेल्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर देशभरात दक्षता घेण्यात येत असून कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरं जाण्यासाठी अनेक संवेदनशील ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बाबरी विध्वंसाला २९ वर्ष होत असून, आता बाबरीनंततर वर्धापनदिनानिमित्त मथुरेतही (Mathura) कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येसह मथुरेत आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी ‘अयोध्या, काशी मंदिराचं काम सूरु आहे, आता मथुरेची वेळ आहे.’ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर परिस्थिती विघडण्याची चिन्ह दिसत होती. त्याच पार्श्वभूमिवर सुरक्षेच्या दृष्टीने मथुरा हे 4 सुपरझोन्स, 4 झोन आणि 8 सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 200 हून अधिक निमलष्करी दलाचे जवान सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज अयोध्येप्रमाणे मथुरेतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत जन्मभूमी-देग गेटकडे कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने ७ डिसेंबरपर्यंत वाहतूकीसाठी एसओपी जारी केला आहे.

Comment here