Belgaum Election Result 2021 Live Update : राजकीय पटलावर दीर्घकाळ परिणाम करणारा बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत कमी मतदान झाल्याने उत्सुकता कमालीची ताणली गेली असून, ५८ प्रभागांतील ३८५ उमेदवारांपैकी कोणाला मतदारांनी आपला कारभारी म्हणून निवडला आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, वा सत्तेच्या जादुई आकड्यापर्यंत पोचण्यासाठी जनतेने कोणाला कौल दिला आहे, या साऱ्या एक आठवड्यापासून ताणल्या गेलेल्या प्रश्नांची उकल आज होणार आहे. पाहा लाइव्ह अपडेट …
बेळगावात ‘भाजप’ची जोरदार मुसंडी
बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यंत भाजपचे 22 तर काँगेस 4 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला आता पर्यंत 3 जागा मिळाल्या आहेत. बेळगाव महानगरपालिकेच्या मतमोजणीनंतर धक्कादायक निकाल समोर येत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या ‘भाजप’ला आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. बेळगावमध्ये मराठी लोक एकत्र झालेले आहेत. जो भगवा फडवकला होता, पुन्हा एकदा फडकणार असल्याचे वातावरण सध्या बेळगावात आहे. ते पाहता बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे कार्यकर्ते मिळून महापालिकेवर भगवा फडकवतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळू नये म्हणून बरेच उपद्व्याप केले आहेत. त्रिशंकू परिस्थिती झाली तर काय करता येईल यासाठी अनेक उपद्व्याप झाले आहेत. मात्र बेळगावची जनता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आपले मत व्यक्त करेल आणि ते मत महाराष्ट्राच्या बाजूनेच असेल असे संजय राऊत यांनी सांगितले.प्रभाग 47 मधून शोभा पाटील विजयी झाल्या असून माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील कॉंग्रेस उमेदवार शकिला मुल्ला विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग 45 च्या रूपा चिकलदींनीसह प्रभाग 28 मधील माजी नगरसेवक रवी धोत्रे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 42 मधून ‘भाजप’चे अभिजित जवळकर विजयी झाले आहेत.बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने (aimim candidate) खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडोळकर विजयी झाले आहेत. (Belgaum election results 2021) सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 3 प्रभागात विजय मिळवला आहे.प्रभाग क्रमांक 16 मधून राजू भातकांडे, 40 मधून रेश्मा कामकर, प्रभाग 18 मधून एमआयएमचे शाहिदखान गौसखान पठाण तसेच बाबजान मतवाले प्रभाग क्रमांक, प्रभाग क्रमांक 11 मधून समीउल्ला माडीवाले, प्रभाग क्रमांक 29 मधून नितीन जाधव विजय झाले आहेत.
Comment here