खंडणी मागितल्याप्रकरणी रिपाइंच्या दोन नेत्यांना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईची भिती दाखवत एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागत असताना दोघांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. सुर्यप्रकाश भदगे आणि रेखा मोरे अशी या दोन आरोपीची नावे असून दोघेही रिपाइंमधील पदाधारी असल्याचं सांगितलं जात आहे.रेशन दुकानदाराकडून १ लाख ३५ हजार रुपयांची मागणी या दोघांनी केली होती. तक्रारदाराचे आरे पोलिस ठाणे परिसरातील तबेला क्र २२ येथे दुकान आहे. रेशन दुकानदाराने आरे पोलिसात तक्रार केल्यानंतर सुर्यप्रकाश भदगे आणि रेखा मोरे यांना बेड्या ठोकल्या. पैसे न दिल्यास पोलिस कारवाई करायला लावीन अशी धमकी दोघेही देत होते. अखेर २० हजार रुपये घेताना आरे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले.मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्हीही नेते रामदार आठवले यांच्या रिपाइं पक्षात कार्यरत आहे. सुर्यप्रकाश भदर्गे हे मुंबई उपाध्यक्ष आहेत. तर रेखा मोरे जिल्हा उपाध्यक्ष असल्याचं समजतेय. दोघांनाही रेशन दुकानदारांकडे एक लाख ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. दुकानदाराने तक्रार दिल्यानंतर आरे पोलिसांनी सापळा रचत दोघांना रंगेहात पकडले आहे.
मुंबई : खंडणीप्रकरणी रिपाइंच्या दोन नेत्यांना अटक

Comment here