National

”मोदीजी.. ‘त्या’ देशांतील विमान उड्डाणे त्वरित थांबवावी”

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगात धुमाकुळ घातला असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. त्याबाबत शास्त्रज्ञांनी याबाबत धोक्याची घंटा वाजविली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती केली आहे. वाचा सविस्तर..

मोठ्या प्रयत्नाने आता कुठे देश कोरोनापासून सावरला

कोरोनाच्या नव्या प्रकार (COVID-19) मुळे प्रभावित झालेल्या देशांतील उड्डाणे थांबवावीत. अशी मी पंतप्रधानांना विनंती करतो. मोठ्या प्रयत्नाने आता कुठे देश कोरोनापासून सावरला आहे. हा नवीन प्रकार भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलीय.

नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचा रिपोर्ट
यूरोप तसेच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा उद्रेक झालाय त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय. कारण फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकलीय. उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत. आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.

Comment here