रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने युक्रेनमधील परिस्थिती पुर्णपणे चिघळली होती. १० दिवसानंतर आज रशियाने युद्ध तात्पुरते बंद केले आहे. मात्र आतापर्यंतचे दहा दिवस युक्रेनसाठी खुप कठीण होते. युक्रेनच्या अणुऊर्जा सेंटरवर रशियन सैन्याने हल्ला केल्याचे युक्रेनन सांगितले आणि त्यानंतर शुक्रवारी तणावाची परिस्थितीसुध्दा पाहायला मिळाली होती या दरम्यान युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करावे, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो ला केले होते मात्र हे आवाहन नाटोने फेटाळले. ही मागणी फेटाळल्यानंतर झेलेन्स्की यांनी नाटोला फटकारत खडे बोल सुनावले. युक्रेनमधील परिस्थितीला नाटो जबाबदार असल्याचेही झेलेन्स्की म्हणाले.
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता शुक्रवारी नाटोने युक्रेनला नो-फ्लाय झोन म्हणजेच रशियन क्षेपणास्त्रे आणि युद्धविमानांपासून संरक्षण करण्यास मदत करण्याचे युक्रेनचे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटोची बाजू घेत नाकारले.
झेलेन्स्कीने एका व्हिडीओद्वारे म्हणाले“नाटोची महत्त्वाची बैठक पार पडली. ही एक कमकुवत बैठक होती, एक गोंधळलेली बैठक होती जी युरोपमधील स्वातंत्र्याच्या लढ्याला पहिल्या क्रमांकाचे ध्येय मानत नाही,”झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी लष्करी युतीच्या सदस्यांवर रशियाला युक्रेनियन शहरे आणि गावांवर गोळीबार करण्यास हिरवा कंदील दिल्याचा गंभीर आरोप केला.यावर नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी युक्रेनच्या नो-फ्लाय झोन मागणीला नाकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली. अशा हालचालीमुळे युरोपमध्ये आणखी तीव्र युद्ध भडकू शकते असा इशारा त्यांनी दिला.
युक्रेनमधील परिस्थितीला NATO जबाबदार; झेलेन्स्कीचा गंभीर आरोप

Comment here