मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असून आता अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काय निर्णय़ होणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सातत्यानं राज्यपालांशी संवाद साधण्यात आला. त्यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी आता अध्यक्षाची निवड ही घटनाबाह्य असल्याचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांनी लिफाफाबंद पत्र पाठवलं आहे. राज्यपालांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
राज्य सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यपालांची परवानगी नसताना निवडणूक घेणं अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे राज्यपालांनी परवानगी दिल्यास निवडणूक घेता येऊ शकते. सध्या तरी अशी काही चिन्हे दिसत नाही. नियमांच्या बदलाचा प्रश्नही अनुत्तरीत आहेत. राज्यपालांच्या उत्तरात नेमकं काय आहे हे समजल्यानंतरच पुढं काय हे स्पष्ट होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना; राज्यपालांचे सरकारला पत्र

Comment here