City News

वीज कोसळल्याने २ क्रीडापटूंचा मृत्यू

Nagpur. September 11. सरावासाठी मैदानावर आलेल्या दोन खेळाडूंचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण गंभीर झाला आहे. ही घटना खापरखेडा येथील चनकापूर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चनकापूर येथील क्रीडा मैदानावर अनेक खेळाडू सरावासाठी येतात. येथे काही जण धावण्याचा सराव करतात तर अन्य काही जण क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. तन्मय आणि अनुजसुद्धा सरावासाठीच आले होते. संध्याकाळी पावसाळी वातावरण तयार झालं होतं. यावेळी वीज कोसळल्याने तन्मय आणि अनुजचा जागीच मृत्यू झाला. तसंच सक्षम गोठीफोडे नावाचा अन्य खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Comment here