Highlights for 11th Admission in Maharashtra
✍🏻 10 वी ची परीक्षा रद्द केल्यामुळे 2021-22 या वर्षासाठी इ. 11 वी प्रवेशासाठी कार्यपध्दती ठरवण्यात आली आहे.
👉🏻 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट 11 वी मध्ये प्रवेश देण्यात यावा.
🔸 11 वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.
🔸 सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
🔸 सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
🔸 सदर सामाईक प्रवेश परीक्षा 100 गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
🔸 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.
📍 CET दिलेल्यांना 11 वी प्रवेशासाठी प्राधान्य
🔹 11 वी ची प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच 11 वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
🔹सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.
Comment here