राज्यातील नेते मंडळींमध्ये आणि त्यांच्या कुटूंबीयांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र स्वतः संजय राऊत यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे कळतंय. परंतु त्याच्या कुटूंबातील ४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 58 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे. घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या लाटेतून नेतेमंडळी आणि त्यांचे कुटूंबीयही सुटू शकले नाहीत. संजय राऊत दिल्लीत सध्या दिल्लीत आहेत. ते स्वतः मात्र कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचे कळतंय. दरम्यान अलीकडील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील 13 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यातील जवळपास 72 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि नंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
कोरोनानंतर आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत.
सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबतच आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील 72 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
Comment here