National

हेलिकॉप्टर दुर्घटना: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली घटनेची माहिती

नवी दिल्ली: सीडीएस बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. दोघांवर शुक्रवारी (ता.१०) दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याबद्दलचे सर्व अपडेट्स.
संसदेत आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबद्दल माहिती दिली. तसेच घटनेबद्दलचे तपशील सभागृहासमोर ठेवले. तसेत बिपीन रावत यांच्यासह घटनेत शहीद झालेल्या सर्वांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाईल असे सांगितले. त्यानंतर लोकसभेचे ( अध्यक्ष ओम बिरला यांनी सभागृहात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बिपीन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचं पार्थिव सध्या तामिळनाडूतील कन्नूरमधील वेलिंग्टन मिलिट्री कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे. तिथे त्यांना लष्करी इतमामात मानवंदना देण्यात येणार आहेत.
क्रॅश झालेल्या IAF Mi-17 ची ब्लॅक बॉक्स सारखी महत्वाची उपकरणं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून जप्त केली.
जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर जगभरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लींकन यांनी देखील बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर आपल्या भावान व्यक्त केल्या. ‘जनरल रावत यांना एक हे वेगळा नेता म्हणून लक्षालं जाईल’. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली.
शासकिय प्रोटोकॉलनुसार अशी पदं जास्त काळ रिक्त ठेवता येत नाही. बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण? यावर आता चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान या पदासाठी २ मराठी अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत.

Comment here