Aurangabad, 29 May. शहरातील नालेसफाईची उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच कटकटगेट येथे नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
खाम नदीला जोडणाऱ्या शहरातील विविध नाल्यांची पाहणी श्री. पांडेय यांनी शुक्रवारी केली. रेणुका माता मंदिर, ज्ञानेश्वर नगर, एन-2, एन – 9 हडको, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बंगला, कटकटगेट, दमडी महल,महापालिका मुख्य इमारती मागील नाला, अंजली टॉकीज समोरील नाला, औरंगपुरा, देवनगरी, प्रताप नगर, डी मार्ट, येथील नाल्यांची पाहणी केली. नाल्यावर जाळी बसविणे, चेंबर बनवणे, ढापे टाकणे, पीचींग करणे अशा कामाची पाहणी करुन उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिले. रेणुका माता येथील नाल्यात कचरा टाकू नये म्हणून जाळ्या बसवाव्यात. एम-2, एन-9 हडको येथे नाल्यावर दुकानदाराने स्लॅब टाकून त्याची देखभाल करावी अशा आशयाची नोटीस बजावण्याचे आदेश दिले. कटकट गेट येथील नाल्यातील कचरा पाहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Comment here