२०२१ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आलं असताना वर्षभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सोशल मीडिया कंपन्यांकडून घेतला जातो. अशीच एक यादी ‘याहू’ने Yahoo जाहीर केली आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यनसह त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे आर्यन खानला अधिकाधिक लोकांनी सर्च केलं. तर शेतकरी या यादीत अग्रस्थानी आहेत. व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चौथ्या स्थानी आहे. अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी राजला अटक करण्यात आली होती.
Yahooच्या या रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, ममता बॅनर्जी आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांना सर्वाधिक सर्च केलं. पंतप्रधान मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर असून सिद्धार्थ शुक्ला चौथ्या क्रमांकावर आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सिद्धार्थचं सप्टेंबरमध्ये निधन झालं. त्याच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली.
Yahooने सर्वाधिक सर्च केलेल्या पुरुष सेलिब्रिटींचीही वेगळी यादी जाहीर केली. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला पहिल्या क्रमांकावर आहे. तर सलमान खान दुसऱ्या आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सहाव्या स्थानी तर अक्षय कुमार सातव्या स्थानी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आठव्या आणि शाहरुख खान नवव्या क्रमांकावर आहे.
भारतात २०२१ या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या महिला सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेत्री करिना कपूर खान पहिल्या स्थानी आहे. कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
Comment here