मुंबई : सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंह यांना समन्स बजावण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याच समन्स बजावण्यात आलं आहे.
मरीन ड्राईव्हमधील शयमसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आलंय. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे.
अॅट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला – विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. सोमवार- मंगळवारी सीआयडीकडून परमबीर यांची चौकशी होणार असल्याचे समजते.
सीआयडीकडून परमबीर सिंग यांना समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Comment here