Aurangabad, 10 June. औरंगजेबाच्या काळात औरंगाबाद हे त्याचे मुख्यालय झाले तेव्हा त्याच्याबरोबर उत्तरेतून अनेक सरदार/राजे औरंगाबादला आले. त्यांची नावे ते ज्या भागात राहत होते त्या भागाला पडली. त्याशिवाय इतर कारणांनीही काही भागाची नावे पडली असावीत. त्या काळात औरंगाबाद शहरात 54 उपनगरे होती म्हणजे पुरे होते असे म्हणतात. औरंगपुरा व बेगमपुरा ह्या भागात जास्त वस्ती होती. काही पुऱ्यांची नावे प्रसिद्ध आहेत. ती आपल्याला माहिती असतात परंतु सर्व पुरे माहित नसतात. मी शोध घेतला तेव्हा मला पुढील नावे सापडली. –
१. बेगमपुरा २.औरंगपुरा ३.मुकाम पुरा ४.फाजल पुरा ५. अहिर पुरा ६.दावत पुरा ७.नवाब पुरा ८.बायजीपुरा ९. दरवेश पुरा १०.नकाश पुरा ११. कुतुब पुरा १२. जासूस पुरा १३.सुलतानपुरा १४. करणपुरा १५.चेलीपुरा १६.सुबकरण पुरा १७. इस्माईल पुरा १८. तानजी पुरा १९.पदमपुरा २०.लास गोपालपुरा २१.मंझूर पुरा/मोमीन पुरा २२. हैसिंगपुरा २३. पर्तबपुरा २४. पहाडसिंगपुरा २५.जमाल पुरा २६.मानसिंग पुरा २७.जयसिंगपुरा २८. जसवंत सिंग पुरा २९.भावसिंगपुरा ३०.जयचंद पुरा ३१.रणमस्त पुरा ३२. पायदा पुरा ३३. हमीलपुरा ३४.धोरी पुरा ३५.कल्हल पुरा ३६. पारस पुरा ३७.तबिब पुरा ३८.रामरस पुरा ३९.चकर पुरा ४०..कोतवाल पुरा ४१.लालवंत पुरा ४२. असद पुरा ४३.रामपुरा ४४.रेंगटी पुरा ४५.केसरसिंग पुरा ४६. बलोच पुरा ४७.राम्बापुरा ४८.खोकडपुरा ४९.मौजी पुरा ५०.जासूदपुरा ५१. रशीद पुरा ५२.किराड पुरा ५३. महमूद पुरा ५४. उस्मान पुरा
या शिवाय कबाडी पुरा, पेन्शन पुरा, मालजी पुरा आणि बहादर पुरा सुद्धा आहेत.
1830 च्या सुमारास औरंगजेबाच्या किलेअर्क महालातून दिसणारा बेगमपुरा.
Comment here