City News

Aarti Singh (CP Amrawati) is recognized worldwide by her outstanding work during Covid pandemic

अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमाने दखल घेतली आहे. केंद्र शासनाने गत काही दिवसांपूर्वी त्यांना वूमेन वॉरिअर्स पुरस्काराने गौरविले. देशातील एकमेव आयपीएस डाॅ. आरती सिंह यांच्या कार्यकर्तृत्वाने पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली गेली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरूक्ष झाला. राज्यात अत्यंत वाईट परिस्थितीत कोरोनावर शासन मार्ग काढत असताना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या तेव्हा नाशिक येथे पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होत्या. मालेगाव हे संवेदनशील असल्याने कायदा, सुव्यवस्था हाताळताना कोरोनाची स्थिती हाताळणे अतिशय नाजूक हाेते. मात्र, डॉ. आरती सिंह यांनी जातीय सलोखा राखून कोरोना नियंत्रणात आणला. मालेगाव येथे कंटेन्मेंट झोन, कोरोनाविषयी जनजागृती, संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना, सॅनिटायझरचा वापर, मास्कचे वितरण, शारीरिक अंतर राखणे आदींविषयी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली. परिणामी मालेगाव येथ कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली. मालेगावाचे ४० अंश सेल्सिअस तापमान असताना कोरोनात वारिअर्स म्हणून पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी १२ तासांपेक्षा जास्त काम केले आणि कोरोनाची परिस्थिती हाताळली. जातीय तेढ निर्माण होऊ न देता हिंदू-मुस्लिम बांधव कोरोनाविरुद्ध एकत्र लढले. डॉ. सिंह यांच्या कार्याची दखल थेट केंद्र शासनाने घेत त्यांना वूमेन वॉरिअर्स पुरस्काराने गाैरविले. पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी भंडारा, गडचिरोली, नाशिक येथेही कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये घेण्यात आली

Comment here