औरंगाबाद : पडेगाव येथे २० वर्षापुर्वी वसलेले जुने अन्सार कॉलनी नागरी वसाहतीतंर्गत खासदार इम्तियाज जलील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत खासदार निधितुन मुख्य रस्ता रॉयल हॉटेल ते अकबरी मस्जिद पर्यंत पहिल्यांदाच १२.६० लक्ष रुपयाचे नविन सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्यात येत आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज दुपारी एक वाजता नविन रस्त्याच्या कामाचे शुभारंभ केल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली आहे.
सदरील परिसरात राहणाऱ्या नागरीकांना रहदारी व वाहतुक करण्यासाठी आजपर्यंत रस्ताच नव्हता, रस्ता तयार करुन देण्यात यावा याकरिता स्थानिक नागरीकांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागास अनेक वेळा निवेदने देवुन आंदोलने सुध्दा केलेली आहे. परंतु आजपर्यंत त्यांच्या मागणीस यश आले नव्हते. रस्ता नसल्याने पावसाळ्यात वाहने चिखलात अडकुन सतत अपघात होत असल्याने घटना घडल्याने परिसरातील नागरीकांना प्रचंड त्रास सोसावा लागत असे.
वसाहतीत पहिल्यांदाच नविन सिमेंट काँक्रीटकरण रस्ता तयार होत असल्याने जुने अन्सार कॉलनी पडेगाव येथील स्थानिक नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करुन आभार मानले.
पडेगाव येथे सिमेंट काँक्रिटिकरण रस्त्याच्या कामाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते शुभारंभ

Comment here