आडुळ (जि.औरंगाबाद) : हॉटेलमधून जेवण करुन चुकीच्या दिशेने चालणाऱ्या कारने समोरुन येणाऱ्या दुचाकी व कारला धडक दिल्याने कारमधील दोन व दुचाकीवरील दोन जण असे चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.११) रोजी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-पांढरी (ता.औरंगाबाद) शिवारात घडली. कार (एमएच २० सीएस ६८३८) पांढरीकडुन औरंगाबादकडे चुकीच्या दिशेने जात होती. त्यावेळी औरंगाबादकडुन आडुळकडे येणारी कारला (एमएच २० ईई ३१०७) आल्टो कारने समोरुन जोराची धडक दिली. दुसऱ्या कारच्या पाठीमागे आडुळकडे जात असलेली दुचाकी (एमएच २१ बीआर ९०८०) कारला पाठमागुन धडकली.
Aurangabad – Solapur Highway 3 accidents and 4 injured

Comment here