Bhanudasnagar, Aurangabad, 4 June. भानुदासनगरातील ड्रेनेज चोकअपमुळे नागरिक त्रस्त आहेत. येथील नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घर सोडण्याची आली वेळ : घरात घाण पाणी साचल्यामुळे अनेकांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. दुर्गंधीतच महिलांना घरातील कामे करावी लागत आहे,काल पर्वा झालेल्या पावसाने ही या भागातील नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी गेले.काहींना घरे सोडावी लागली. दुर्गंधीमुळे मुले आजारी पडत असल्याचे येथील महिलांनी सांगितले.
अनेकींच्या डोळ्यांत अश्रू : दोन महिन्यांपासून आमच्या व्यथा मांडत आहोत, दखल घेण्यास कोणी तयार नाही, अशा शब्दांत व्यथा मांडताना महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले.भानुदास नगरातील 6 गल्यात नगरसेवीकेने सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवले आहेत मात्र गल्ली क्रमांक 7 मध्ये रस्ते बनविण्याचा दुजाभाव केला आहे.याच गल्लीत ड्रेनेजचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात जात आहे.वार्ड अधिकाऱ्यांना वेळीवेळी तक्रार देऊनही या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. या परिसरात स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याची नागरिकांची मागणी आहे.
Comment here