City News

शिवसेनेतर्फे पत्रकार सरकटे यांन ६० हजारांची रोख मदत सुपूर्द

Aurangabad, 4 June. शहरातील जेष्ठ पत्रकार भीमसेन सरकटे यांना गेल्या वर्षभरापासून अर्धांगवायूचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट असतांना शिवसेना मदतीला धावली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकटे यांच्या घरी भेट देऊन ६० हजाराची मदत केली. तसेच किराणा साहित्य वाटप करून कुटुंबियांना दिलासा दिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एका महिन्याचे निवृत्तीवेतनातून ही मदत केली.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, सीमा गवळी, राखी सुरडकर, चंदू गवई, बद्री ठोंबरे, विरु गादगे, हुशारसिंग चौहान, रोहित सरकटे, मानसी सरकटे, पत्रकार प्रतिनिधी रतनकुमार साळवे, बबनराव सोनवणे, रामेश्वर दरेकर, गणेश पवार, जगन्नाथ सुपेकर, हसनशहा, शेख शफीक, सुनील निकाळजे, रमेश बावसकर आदी उपस्थित होते.

 

Comment here