Aurangabad, 2 June. 🔴लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांच्या दुकानांना लावण्यात आलेले सील काढण्यासाठी आज इम्तियाज जलील यांनी व्यापाऱ्यांना घेऊन कामगार आयुक्तालय येथे भेट दिली .
🔴यावेळी कामगार आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचे कारण पुढे करत यामध्ये आमची काही चूक नसून जिल्हाधिकारी यांना भेटण्यास सुचवले असता, खासदार इम्तियाज जलील कामगार आयुक्तांवर चांगलेच भडकले व म्हणाले कि तुमची जबाबदारी मजदुरासाठी आहे, लेबरसाठी आहे, तुम्ही येथे कलेक्टरची जी-हुजूरी करण्यासाठी नाही बसलेले आहेत. कलेक्टर साहेबांना सांगा मग या मजूरांना पगार द्यायला.
🔴कलेक्टर म्हणजे भगवान नाही. लॉकडाउन काळात व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केले. सध्या व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे या काळात व्यापाऱ्यांच्या दुकानांना लावण्यात आलेले सील काढावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
🔴तसेच मिलन मिठाई मधील मिठाई कोणा- कोणास मिळाली, मला सांगा मि सुद्धा रस्त्यावर उभे राहून पैसे जमा करुन या अधिकार्यांना देतो असे सुद्धा जलील म्हणाले.
Comment here