नवी दिल्ली- यूरो कपच्या पोर्तुगाल टीमचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो पत्रकार परिषदेत आपल्या समोर कोका-कोलाची बॉटल (Coca-Cola bottles) पाहून नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. रोनाल्डोने कोका-कोलाच्या बॉटल्स दूर केल्या आणि हातात पाण्याची बॉटल घेत आपण फक्त पाणी प्यायला हवे असा संदेश केला. 36 वर्षीय रोनाल्डो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कसल्याही प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सपासून दूर राहतो. त्याने आपल्या कृतीतून घेच दाखवून दिलंय.
कोका-कोला UEFA यूरो कपचा अधिकृत स्पॉन्सर : कोला कोला 11 देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या UEFA यूरो कपचा अधिकृत स्पॉन्सर आहे. कंपनीने ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी सर्व पत्रकार परिषदेत बॉटलला दर्शनी भागात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हंगेरीविरोधात मॅचच्या आधी रोनाल्डो आणि पोर्तुगालचे कोच फर्नांडो सांतोस पत्रकार परिषदेसाठी आले, तेव्हा दोन कोका कोला बॉटल्स टेबलावर ठेवण्यात आल्या होत्या. रोनाल्डोने त्या पाहिल्यानंतर त्यांना तत्काळ तेथून बाजूला केलं. शिवाय पाण्याची बॉटल हातात घेत पोर्तुगिजमध्ये ‘Agua!’ असं म्हटलं.
कोका-कोला कंपनीला फटका : क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या या कृतीमुळे कोका-कोला कंपनीला मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. कारण, कोका कोलाची स्टॉक किंमत 1.6 टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीच्या स्टॉक किंमतीमध्ये USD 242 अब्जवरुन USD 238 अब्ज अशी घसरण झाली आहे. कंपनीला USD 4 अब्जचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोची कृती कोका-कोला कंपनीला महागात पडल्याचं दिसतंय. ‘द डेली स्टार’ रिपोर्टने यासंदर्भातील माहिती दिलीये.
Comment here