नांदेड : राज्यभरात गाजलेल्या शासकीय धान्य घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी इंडिया मेगा ऍग्रो कंपनीचे (India Mega Agro) संचालक अजय बाहेती (Ajay Baheti) यांना अटक केलीय. काही महिन्यांपूर्वीच बाहेती यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर कंपनीत त्यांनी उत्पादन ही सुरु केले होते. कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी भागात अजय बाहेती यांची इंडिया मेगा ऍग्रो अनाज या नावाची कंपनी आहे. या कंपनीत शासकीय धान्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली होती.
शुक्रवारी ईडीकडून अटक
त्यानंतर मीना यांनी वेगळे पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावला. वेषांतर करून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात शासकीय धान्याचे ट्रक इंडिया मेगा कंपनीत जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या संचालक यासह धान्य पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल केले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेती सह अन्य मंडळींची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर बाहेती यांनी परत आपल्या व्यवसायास सुरवात केली होती. परंतु शुक्रवारी ईडीने बाहेती यांना अटक केलीय.
Comment here