जालना : वाळूमाफियांच्या शोधात पोलिसांनी विनापरवानगी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे Union Minister For State Raosaheb Danve यांच्या जाफराबाद Jafrabad येथील संपर्क कार्यालयाची झडती घेतल्या प्रकरणी दोन पोलिस अधिकारी, तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख SP Vinayak Deshmukh यांनी सोमवारी (ता.१४) ही Jalna कारवाई केली. जाफराबाद येथे एका पत्रकारावर वाळूमाफियांनी हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताचा शोध सुरु केला. काही संशयित हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात असल्याची माहिती जाफराबाद पोलिसांनी मिळाली. मात्र, यासंदर्भात कोणाताही गुन्हा दाखल नसताना, वरिष्ठांना माहिती न देता पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली. या संदर्भात दानवे यांनी पोलिस अधीक्षक देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. संपर्क कार्यालयाची झडती का घेतली, त्यातून काही निष्पन्न झाले? या बेकादेशीर कारवाईमुळे बदनामी होत असून या प्रकाराची चौकशी करून संबधितांवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली होती.
Five Police Personnel Suspended For Checking Raosaheb Danve’s Office.

Comment here