नवी मुंबई : मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही आणि मलाही जनतेने कधीच जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून तयार केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचे लोकार्पण करण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते.याप्रसंगी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. राज्यात सर्वाधिक जागा निवडून येऊनही महाविकास आघाडीमुळे तोंडचा घास निघाल्याचे शल्य अनेकद भाजपच्या विविध मंत्र्यांच्या टीकेतून दिसून आले आहे. भाजपकडून महाविकास आघाडीवर वारंवार निशाणा साधला जातो. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरून, तर कधी विचारला जातो; परंतु आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून व्यक्त केली.शेवटी मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नाही. तो काय काम करतो आहे. ते महत्त्वाचे आहे. गेले दोन वर्षे एकही दिवस मी घरात न थांबता जनतेत जात आहे. मी जनतेच्या सेवेत आहे.
I feel Still CM as Maharashtra public showed such a love to me : Devendra Fadnavis

Comment here