Aurangabad. देशात गेल्या 24 तासांत, लसीच्या 56,36,336 मात्रा देण्यात आल्या असून भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (56,64,88,433) काल 56 कोटी 64 लाखांचा टप्पा पार केला. हे यश 63,13,210 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून साध्य करण्यात आले. संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
गेल्या 24 तासांत 39,157 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,15,25,080 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर सध्या 97.53% म्हणजे मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग त्रेपन्न दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे
गेल्या 24 तासांत, भारतात फक्त 36,401 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
Comment here