केप टाऊन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी उशिरा भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबर रोजी सुरु होणार होता मात्र आता हा दौरा 9 दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आता 26 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.
नव्या तारखांनुसार भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिली कसोटी 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान खेळणार आहे. ही कसोटी चेंच्युरियन पार्कवर खेळवण्यात येईल. त्यानंतर जोन्सबर्गमध्ये 3 जानवारीला दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येईल. तर तिसरी केपटाऊन कसोटी 11 ते 15 जानेवारी दरम्यान होईल.
गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने आपला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात काही सुधारणा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आफ्रिका दौऱ्यातील टी 20 मालिका स्थगित करत दौरा कसोटी आणि एकदिवसीय मालिकांपुरता मर्यादित केला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कोसटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अतर्गतच खेळली जाईल.
भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
26 ते 30 डिसेंबर पहिली कसोटी सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
3 ते 7 जानेवारी दुसरी कसोटी, इंपिरियल वाँडर्स, जोहान्सबर्ग
11 ते 15 जानेवारी तिसरी कसोटी न्यूलँड्स, केपटाऊन
19 जानेवारी पहिला एकदिवसीय सामना, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ली
21 जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना, युरोलेक्स बोलँड पार्क, पार्ली
23 जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन
Comment here