Sports

INDvsNZ 2nd test : भारताने कसोटी मालिका १ – ० ने जिंकली

मुंबई : मुंबई : वानखेडे कसोटीत आज चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे उरलेला पाच फलंदाज झटपट बाद करुन भारत २ सामन्यांची कसोटी मालिका १ – ० ने जिंकली. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 540 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावात गुंडाळत सामना 372 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली . भारताकडून दोन्ही ऑफ स्पिनर जयंत यादव आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ४-४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या.
भारताने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावात गुंडाळला. भारताकडून दोन्ही ऑफ स्पिनर जयंत यादव आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या.

भारताने नाफेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामावीर मयांक अग्रवालच्या दमदार १५० धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने विश्वविक्रमी गोलंदाजी करत भारताचा संपूर्ण संघ एकट्यानेच बाद केला. एका डावात १० विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.

त्यानंतर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावातच गुंडाळात सामन्यावर मजबूत पकड मिळवली. मात्र भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता फलंदाजी करत दुसऱ्या डावात ७ बाद २७६ धावा उभारल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५३९ धावांचे महाकाय आव्हान उभे राहिले. तिसऱ्या दिवशी हे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा निम्मा संघ १४० धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.

Comment here