Jalgaon Crime: 22 May. कौटुंबीक वादातून दीराने डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावातील पिंप्राळा भागात घडली आहे. याप्रकरणी दीराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत योगिता सोनार त्यांच्या कुटुंबीयांसोबत रहात होत्या. मागील दहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबीक कारणावरून सातत्याने वाद होत होते. शुक्रवारी अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने वहिनी योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. योगिता यांना ८ वर्षांचा मुलगा आहे. घटनेची माहीती मिळाल्यानतंर घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस पथकाने संशयित दीपकला ताब्यात घेतले आहे. दीपक हा शहरातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Jalgaon Crime: वहिनीसोबतचा वाद विकोपाला गेला; दीराने केले ‘हे’ भयंकर कृत्य

Comment here