Aurangabad, 12 June. खासदार छञपती संभाजीराजे हे कोपर्डी व कायगाव येथे येणार असल्यामुळे औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक व मराठा आंदोलक हे आज सकाळी अहमदनगर कोपर्डीकडे रवाना झाले होते.यावेळी एक मराठा लाख मराठा,कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा घोषणा देण्यात आल्या. कोपर्डी,अहमदनगर येथे स्वर्गीय श्रद्धा वऔरंगाबाद येथे स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहे.मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याने औरंगाबाद येथील प्रमुख समन्वयक व मराठा आंदोलक हे अहमदनगर कोपर्डीकडे रवाना झाले होते.आज सकाळी कायगाव टोका येथे एक मराठा लाख मराठा,कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणा देण्यात आल्या.यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एक मराठा लाख मराठा,कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा घोषणा देण्यात आल्या.

Comment here