City News

औरंगाबाद शहरात खुनाची मालिका सुरूच

Aurangabad, 5 June. Anwar Pathan – Crime. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमीर खान याचा त्याच्या साडूसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद होता. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटकेही उडायचे. शुक्रवारी जमीर खान हा शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीच्या शटरजवळ उभा होता. रात्री नऊ वाजेपासून तो तेथेच होता. अंदाजे साडेनऊच्या सुमारास जमीरचा साडू अन्य एकाला घेऊन तेथे आला. त्यांनी जमीरसोबत वाद घातला. त्यांचा वाद टोकाला जाताच आरोपीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर वार केले. छातीवरील वार वर्मी लागल्याने जमीर जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. शहागंजमध्ये सतत गर्दी असते. ही घटना घडली तेव्हाही तेथे बरेच लोक होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका रिक्षातून जमीरला घाटीत हलविले. सिटी चौक पोलिस ठाण्यासमोरून जाताना हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक मुजगुले यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत

घरफोडी, चोरीतील आरोपी
जमीर खान ऊर्फ जम्या हा घरफोडीसह चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी आहे. मात्र, तो मागील काही दिवसांपासून शांत होता. दरम्यान, त्याचा साडूशी वाद असल्याचे तपासात समोर आल्यावर सिटी चौक आणि गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

पंधरा दिवसांत सहा खून…

शहरात खुनाचे सत्र सुरुच असून मागील पंधरा दिवसांतील हा सहावा खून आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीत २, छावणी १, सिडको १, एमआयडीसी सिडको १ आणि आता सिटी चौक ठाण्याच्या हद्दीत १ असे सहा खून झाले आहेत. यातील सिडको आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील एक अशा दोन खुनांचा अद्याप उलगडादेखील झालेला नाही. खुनाची मालिका रोखणे आणि गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पोलिसासंमोर आहे.

Comment here