Sports

On This Day Virender Sehwag : सेहवागसाठी आजचा दिवस आहे फारच खास

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागसाठी आजचा म्हणजे 8 डिसेंबर हा दिवस फार खास आहे. कारण आजच्याच दिवशी विरेंद्र सेहवागने आपला आयडॉल सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवले आणि इतिहासात आपल्या खेळीची नोंद केली. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशक ठोकरणारा दुसरा खेळाडू ठरला.
विरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 रोजी होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने (Team India) वेस्ट इंडीज समोर 418 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 149 चेंडूत 219 धावांची आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूने गौतम गंभीरनेही 67 धावांची खेळी केली होती.
विशेष म्हणजे या सामन्यात विरेंद्र सेहवाग भारतीय संघाचा कर्णधार होता. या सामन्यात सेहवाग बरोबरच सुरेश रैनाने 44 चेंडूत 55 धावांची खेळी केली होती. भारताच्या या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ 49.2 षटकात 265 धावात संपुष्टात आला होता. विकेटकिपर दिनेश रामदीनने 96 चेंडूत 96 धावांची खेळी केली होती.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम द्विशतक करणारा पहिला फलंदाज हा देखील भारतीयच होता. विरेंद्र सेहवागचा आदर्श सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी केली होती.

Comment here