Gangapura, 4 June. धक्कादायक सध्या कोरोना च्या रुग्णां संख्या मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे मात्र तिसरी लाट येण्याचे संकेत असल्याने प्रशासन त्यानुसार तयारी करताना तसेच उपायोजना करत आहे तसेच कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवत असल्याचं समोर येत असताना, औरंगाबादच्या गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन चोरीला जाता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे चोरी करणारा व्यक्ती कैमेरत कैद झाला आहे. याप्रकरणी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, गंगापूर डीसीएचसी सेंटर मधून 1 जून रोजी दुपारी दोन वाजता जम्बो ऑक्सीजन सिलेंडर मधून आनंत कुमावत यांनी ऑक्सिजन पाईप द्वारे दोन छोटे सिलेंडर भरून ऑक्सिजन चोरून नेले आहेत.तसेच अशी घटना यापूर्वीही घडली आहे. आधीच ऑक्सीजन तुटवडा आहे, त्यात अशाप्रकारे ऑक्सिजन कुणालाही न विचारता भरून घेत असल्याने ऑक्सिजन कमी पडून रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं, तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन चोरी करताना चा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
Oxygen theft in Gangapur Aurangabad.

Comment here