पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र, दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रोमव्हे रिएंट आल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जंम्बो कोविड रूग्णालय सुरूच ठेण्यात येणार आहे, त्याबाबतचा निर्णय 31 डिसेंबर रोजी घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. पुण्यात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, शहराती रूग्णसंख्या कमी होत असल्याने खूल्या जागेतील गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली 50 टक्के उपस्थितीची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेलादेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्दर, या सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन कारावे लागणार आहे, असे पवार यांनी नमूद केले.
1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु
पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात भिमथडी जत्रेला परवानगी देण्यात आली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
Comment here