Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात । Reliance GIO 5G network | हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.
रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.
याशिवाय, हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही 5G नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केलेला नाही.
सध्या Reliance JIO कडून mmWave आणि मिड-बैंड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून नेटवर्क आणि उपकरणांची चाचणी केली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने 5G तंत्रज्ञान आणि प्राथमिक रचना तयार केली आहे. यामध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी, मॅक्रो बेस स्टेशन, इनडोर सेल आणि कोर सॉफ्टवेअर नेटवर्कचा समावेश आहे.
Comment here