Aurangabad, 9 June. गेल्या 3 महिन्यापासून कोरोना संसर्गाने आरटीओ कार्यालयाच्या अनेक विभागांचे कामकाज ठप्प झाले होते. विशेषतः ड्रायव्हिंग लायसन्ससाठी च्या परीक्षा गेल्या दीड-दोन महिने होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे वाह नधारकांना अडचणीचा सामना करावा लागला. आता लॉक डाऊन संपल्यानंतर कालपासून ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काल जवळपास १०० उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले. या उमेदवारांना तातडीने आजची तारीख देण्यात आली. होती. त्यामुळे आज सकाळी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्या उपस्थितीत या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. या सर्वांना शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार आहेत.
RTO, Aurangabad started functioning full fledged after lockdown

Comment here