मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (nawab mailk) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. “अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रं शेअर केली आहेत. समीर वानखडे यांच्या आईची नोंद मृत्यूनंतर आधी मुस्लिम मग हिंदू याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट केले. दरम्यान अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करणारा आदेश देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने फेटाळल्याने त्याला समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी बुधवारी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अपिलाद्वारे आव्हान दिले. या अपिलावर आज, गुरुवारी न्या. शाहरुख काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे.
Sameer Dawood Wankhede is Muslim ! Nawab Maliks new fire

Comment here