City News

संजयनगरातील गल्ली क्रमांक ९,१०,११ येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Sanjay Nagar, Aurangabad, 4 June. संजयनगरच्या गल्ली क्रमांक ९,१०,११ या भागात चार दिवसांनंतर पाणी येते. मे महिन्यात या भागातील नळांना दुर्गंधीयुक्त दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जारच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. नळाला येणाऱ्या पाण्याला इतकी दुर्गंधी असते की या पाण्याने आंघोळ करणे किंवा कपडे धुणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे नागरिक खासगी टँकर मागवतात आणि घरच्या हौदात टँकरमधील पाणी साठवून ठेवतात. दुर्गंधीयुक्त पाणी हौदातील पाण्यात मिसळत असल्यामुळे हौदातील पाणी देखील वापरण्या योग्य राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या बाबद दलित युथ पँथरचे संदीप गायकवाड यांनी मनपा अतिरिक्त आयुक्तांना या भागातील पिण्याची पाईपलाईन बदलून देण्याबाबद निवेदनही दिले होते मात्र आळशी मनपाच्या कारभाराचा प्रत्यय येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Comment here