👉🏻कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनेच सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.
👉🏻 मागीलवर्षी राज्यातील काही ठिकाणी सप्टेंबरपासून शाळा सुरू झाल्या. पण कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्या मूळे त्या वर्षभर चालल्य
🛎️शाळांची प्रत्यक्षातील घंटा वाजण्यास आणखी २ ते ३ महिने लागू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
👉🏻 वर्गातील शिक्षणापेक्षा ऑनलाईनचे धडे अधिक प्रभावी व्हावेत म्हणून विद्या परिषदेने विशेष नियोजन केले असून सह्याद्री वाहिनीवरील दररोज पाच तास शिक्षणासाठी मिळणार आहेत.
📺 घराघरांत टीव्ही असल्याने यंदा सह्याद्री वाहिनीवरुन शिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी गतवर्षीपेक्षा यावर्षी जादा तास मंजुरी मिळवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
✅प्रथम दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन नियोजन केले असून त्यानंतर पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाचे नियोजन केले जाईल. त्याचे वेळापत्रक लवकरच शिक्षक आणि पालकांच्या माहितीसाठी देण्यात येणार असल्याचेही टेमकर म्हणाले.
📌 *दहावीचा निकाल कधी लागणार! जाणून घ्या..*
👉🏻कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर दहावीचा परीक्षेचा निकाल मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते,
👉🏻आता १५ जुलैला दहावी बोर्डचा निकाल लागणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून मिळाली असून, नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
👉🏻त्यासाठी शाळेकडून विशिष्ट आरखड्यात ऑनलाइन पद्धतीने गुण मागवून घेतले जातील.
Comment here