Aurangabad, 7 June. पहिला पाऊस पडला की महिलांची लोणचे टाकण्यासाठी लगबग सुरू होते. सध्या गेल्या 2 ते 3 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने यातच आता बाजारपेठेत गावराणी कैऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे.50 ते 60 रुपये किलोने कैऱ्या विकल्या जात असून घरी कैऱ्या फोडण्यापेक्षा बाजारातच 5 किंवा 7 रुपये किलोप्रमाणे कैऱ्या फोडून मिळत असल्याने महिलांचीही पसंती मिळत आहे. जेवण म्हणजे भाजी-भाकरी, पोळी, पापड, चटणी हे असले तरी अंबट गोड असलेले कैरीच्या लोणच्याची चव चाखण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. यासाठी बाराही महिने पुरेल असा अंदाज घेत महिला लोणचे तयार करण्यासाठी खटपट करत असतात. यंदा काही ठिकाणी गारपिटीमुळे मोहर पडल्याने कैऱ्यांची आवक कमी झाली असली तरीही पर राज्यातून औरंगाबादेत कैऱ्यांची अवाक मोठया प्रमाणावर झाली आहे.बाजारातून मोहरीची डाळ, धणे, बडीशोप, मिरे, हिंग, लाल मिर्ची खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असून दरवर्षाप्रमाणे यावषीही काही प्रमाणात या वस्तूंची भाववाढ झाली आहे.
शहागंज भाजी मंडईसह इतर ठिकाणी देखील कैऱ्या फोडून देण्यासाठी दुकानदारांनी पाण्याच्या बादल्यांसह कोयते घेऊन दुकाने थाटलेली दिसून येत आहे.विक्रेते सकाळी 6 वाजेपासून कैऱ्यांची मांडामांड करतात. मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत असून कैऱ्या फोडून घेण्याकडे गृहणीचा कल असल्याचे दिसून येत आहे.50 ते 60 रुपये किलोने कैऱ्या विकल्या जात असून घरी कैऱ्या फोडण्यापेक्षा बाजारातच 5 किंवा 7 रुपये किलोप्रमाणे कैऱ्या फोडून मिळत असल्याने महिलांचीही पसंती मिळत आहे.
शहागंज भाजी मंडईसह इतर ठिकाणी देखील कैऱ्या फोडून देण्यासाठी दुकानदारांनी पाण्याच्या बादल्यांसह कोयते घेऊन दुकाने थाटलेली दिसून येत आहे.

Comment here