Business & AuctionsCity News

Stop serving Liquor during Election – Nitin Gadkari

Its Amazing how this can be stopped as BJP MLAs are among them who gives Boozing party to the workers to win the election, so how one can stop serving liquor parties during election ? नागपूर : येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक येत आहे. काही लोक दारूची प्रतीक्षाच करीत असते. कुणीही दारूची अपेक्षा ठेऊ नका. निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा, असा सल्ला केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांना दिला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी वंदे मातरम् जन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे. आज भिवसेनखोरी बौद्ध विहार येथील पहिल्या केंद्राचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. व्यासपीठावर स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका माया इवनाते, नगरसेवक सुनील अग्रवाल, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका रूतिका मसराम, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेविका वर्षा ठाकरे आदी उपस्थित होते. महापौर बदलला की काम बंद असे आरोग्य केंद्राचे होऊ नये, नाहीतर आपण बदनाम होऊ, असा इशारा देत गडकरी यांनी आरोग्य केंद्र बंद पडल्यास माझ्याकडे या, आपण पुन्हा सुरू करू, अशी ग्वाहीही दिली.यावेळी त्यांनी भिवसेनखोरी या परिसराची जुनी आठवण काढली. येथील तरुणांना खेळ, रोजगारात लक्ष देण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. याशिवाय मैदानेही आवश्यक असून खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व तयार होईल. रोजगारासाठीही प्रयत्न केले जात असून संगणकाचा अभ्यासक्रम तसेच इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांनी माझ्याकडे बायोडाटा पाठवावा. २०२४ पर्यंत शहर व विदर्भातील १ लाख तरुणांना रोजगार देण्याचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ६० वर्षांवरील नागरिकांना चष्मा, कर्णयंत्र, काठी या वस्तू मोफत देण्यात येत आहे. ज्यांना पाय नसेल, त्यांना पाय लावून दिला जात आहे. अशा नागरिकांची यादीही संदीप जाधव, माया इवनाते यांच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

सर्वच रस्त्यांची दुरवस्था

भिवसेनखोरी परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचा उपरोधिक टोलाही मनपाला हाणला. २५ लाखांत रस्ते दुरुस्त न झाल्यास आणखी ५० लाख देईल, असेही गडकरी यांनी या परिसरातील नगरसेवकांना आश्वस्त केले.

BUT WHAT ABOUT THE REVNEW FROM LIQUOR ?

Comment here