मुंबई: आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडियाचे (air india) अखेर टाटा समूहाने (tata group) अधिग्रहण केले आहे. एअर इंडिया विकत घेण्यासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी झाली आहे. एअर इंडिया खरेदी करण्याची बोली जिंकल्यानंतर टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी ‘वेलकम बॅक, एअर इंडिया’ असे खास टि्वट केले आहे.रतन टाटा यांनी टि्वट करताना जेआरडी टाटा यांचा एअर इंडियाच्या विमानासोबतचा एक जुना फोटोही पोस्ट केला आहे. “हे अधिग्रहण खूप चांगली बातमी आहे. या व्यवहारातून टाटा ग्रुपला हवाई उद्योग क्षेत्रात एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल” असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे.
“Welcome Back” Ratan Tata’s Tweet for Air India.

Comment here